श्रीहरी बाबांचे मंदिर

 

पवनामाईच्या पवित्र कुशीत पावन तीरावर पिंपळे गुरव गाव वसलेले आहे. पिंपळे गुरव हे सद्गुरू श्रीहरी खाडेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्री क्षेत्र पिंपळे गुरव येथे श्रीहरीबाबांची समाधी आहे. आसपासच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रीहरीबाबांच्या समाधी मंदीरात साधकांना नामस्मरण करण्यासाठी गर्भगृहात ध्यानमंदीर आहे. ध्यानमंदीरातच श्रीहरीबाबांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेतल्यावर अनेक भाविकांना सुखद परमानंदाच्या अनुभूती आल्याशिवाय रहात नाही. ध्यानमंदीरातील प्रसन्नता साधकाला भाव समाधीचा आनंद देते. भक्तभाविकांच्या मनाला निरव, सुखद विश्रांती मिळते. हा अनेक भाविक जणांचा अनुभव आहे. दिवसभर मंदीरात वर्दळ असते. मंदिर आणि मंदिराच्या परिसरात सतत प्रसन्नता असते. मंदिर काटे पुरम चौकाच्या जवळ गांगर्डे नगर येथे आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून वरती गेल्यावर सुंदर कासव मुर्तीचे दर्शन होते. मार्बल फरशीमध्ये सुंदर नक्षी काम असलेला सभामंडप पवित्र प्रसन्नतेची ओळख करून दिल्याशिवाय रहात नाही.

दोन बाजुनी चंद्राकृती कमानी चित्त आकर्षीत करून घेतात. समोरच अष्ट्कोनात बांधलेला गाभारा आणि त्यात असलेली राधाकृष्णाची मूर्ती प्रत्येक भाविकांचे मन मोहित करते. किमयागाराच्या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर दृष्टी स्तब्ध होते. नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जातात आणि मस्तक चरणी नम्र होते. देहुडा चरणी उभा असलेला श्रीकृष्ण परमात्मा पाठीमागे उभ्या असलेल्या गाईच्या खांद्यावर ऊजव्या हाताचा स्पर्शकरून व डावा हात राधेला स्पर्श करून उभा आहे. दोन्ही हाताने मुरली धरून राधेकडे पहात आहे. उजव्या हाताचा स्पर्श गाईला केला आहे हे वात्सल्यभावाच्या प्रेमाचे प्रतीक व डाव्याहाताचा स्पर्श श्रीराधेला हे भक्तीचे प्रतीक आहे.

प्रेम आणि भक्ती यांचा संगम म्हणजे कृष्णाच्या हातातील बासरी आहे. सहजच मुरलीधराचे दर्शन घडते. वामांगी उभ्या असलेल्या श्रीराधेचा उजवा हात श्रीकृष्णाच्या खांद्यावर आहे जणु भक्तीच जगतनियंत्याच्या खांद्यावर विसावलेली आहे. राधाकृष्णाच्या पाठीमागे उभी असलेली गाय श्रीकृष्णाच्या चरणाला चाटते तर गाईचे वासरू गाईला चाटते. एकंदरीत वात्सल्यभाव, प्रेमभाव व भक्तिभाव हा त्रिवेणी संगम राधाकृष्णाच्या मुर्तीचे दर्शन घडवते.

हातातील मुरली प्रेमाने भाविकाच्या मनाला मोहिनी घालत आहे आणि भक्तीचे दारिद्रय देशांतराला पाठवत आहे. श्रीराधेच्या हातातील फूल म्हणजे मनरूपी मोगरा भक्तिभावाने परमात्म्याला अर्पण करत आहे आणि गाई श्रीकृष्ण चरणाला चाटते यातुन शुद्धाचरणाने इंद्रिय एकमेकांच्या संगतीत राहून वात्सल्याच्या भावाचे दर्शन करण्यासाठी श्रीकृष्ण चरणी लिन झालेली आहेत. श्रीकृष्णराधा मूर्ती समोर सहज उभे राहिल्यावर शक्ती आणि भक्तीची दृष्टिभेट होते. मूर्तीच्या पाठीमागे प.पु.श्री.सद्गुरू साधुबाबा यांचा पद्मासनामध्ये ध्यानस्थ असलेले छायाचित्र दृष्टीस पडते. नामस्मरण करण्याची प्रेरणा बाबांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मिळते. छायाचित्राच्या वरच्या बाजूला प्रणवचे सगूण रूप ओंकार भगव्या रंगामध्ये नटलेला आहे. भक्ताच्या चित्ताला चेतना देऊन चित्ताला चैतन्याच्या मिलनाचे दर्शन घडवते. मंदिराला प्रदक्षणा घालण्याचा मोह आवरतच नाही. कारण भाविकांना दर्शनात समाधान मिळते त्यामुळे अनेक भाविक प्रदक्षणा घालत असतात.प्रदक्षणा घालून मनावरच ओझे हलके करतात व निश्चिन्त मनाने सभामंडपात विसावतात

मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे सकाळी सुर्यकिरण गाभाऱ्यातील मुर्तीपर्यंत पोहतात आणि संपूर्ण गाभारा तेजोमय प्रकाशमान होतो. हे दृश्य फारच मनमोहक, विलोभनीय असते. राधाकृष्णमुर्तीला वस्त्र, अलंकार, मुकुट आणि अलंकाराचा साज चढवलेला असल्यामुळे जगतनियंत्या किमयागाराच दर्शन मनोहर दिसते. प्रत्यक्ष सूर्यनारायणाचे गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेले किरण सूर्य-नारायण आणि विष्णुनारायण यांचा दुर्लभ भेटीचा अनोखा संगम प्रत्यक्ष विनासायास पहाता येतो. विशेष म्हणजे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना राधाकृष्णमुर्तीचे सहज दर्शन घडते. सभामंडपात राधाकृष्णमूर्ती समोर उभे राहील्यावर दृष्टी समांतर मुर्ती डोळ्यासमोर उभी राहते. हे विशेष वैशिष्ट्य आहे. याच सभामंडपात, प्रवचन, कीर्तन, कथा नित्य नेमाने होतात. कृष्ण मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजुने जिने आहे. याच जिन्यातुन ध्यानमंदिरात जाता येते. ध्यानमंदिरात सद्गुरू श्रीहरी खाडेबाबा यांची समाधी आहे. साडेतीन फूट लांबी-रुंदी व उंचीची सात पायऱ्या असलेली समाधी आहे. समाधीवर बाबांच्या पादुका कोरलेल्या आहेत. समाधीच्या पाठीमागे सद्गुरू श्रीहरी बाबांचे मोठे छायाचित्र आहे. बाबांच्या सहजासनमध्ये अनेक मुद्रा धारण केलेल्या असुन त्यामधून समचरण, समदृष्टीचे दर्शन होते.

सागवाणी लाकडामध्ये सुंदर नक्षिकाम, वेलबुटी, मोराचे पिसारे कोरलेले आहेत. अष्ठकोनात खांब व त्यावरील नक्षिकाम पिसारा फुलवलेल्या मयुराचे चित्र प्रत्येक कमानीवर कोरलेले आहे. त्यामुळे समाधी स्थळाचे वैभव प्रसन्नतेकडे घेऊन जाते. प्रत्येक साधकाचे मन आकर्षीत होते. व तो साधना करण्यासाठी बसतो. तनमनाची एकाग्रता भावसमाधीचा आनंद सहज मिळतो.समाधी स्थळासमोर संपूर्ण मार्बल फरशीत सात्वीक भाव प्रकट होतील व प्रसन्नता मिळेल अशा प्रकारची रंगसंगती मार्बलची रचना करून बनवलेले आहे. बाबांचा शिष्य परिवार व अनेक भावीक रोज तासनतास ध्यानकरण्यासाठी बसतात व समाधी सुखाचा आनंद लुटतात. मंदीरावर बावन फुटाचा कळस अनेक कलाकुसरीन सुशोभित असुन अनेक देवता विराजमान आहेत. पंच धातुचा सुवर्णकळस कोंदणात बसवलेल्या हिऱ्याप्रमाणे मंदिरातच शिरोभूषण आहे. विश्वातील सात्वीक लहरी केंद्रित करून गर्भगृहात संक्रमित करण्याच कार्य सुवर्ण कळस करत आहे. तत्व आणि सत्व प्रकाशित करण्याच कार्य याच सात्वीक लहरी करत असतात. ध्यानमंदिरात सद्गुरूंची समाधी आहे. त्याठिकाणी गुरुतत्व विद्यमान आहे. मध्ये साक्षात पूर्णब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा असुन कळसाच्या गाभाऱ्यात प्रत्यक्ष शिव विराजमान आहे. गुरुतत्व, परब्रम्ह्याच परमतत्व आणि शिवाचे शिवतत्व या तत्वांच चैतन्य आणि भक्तांची साधना त्याच बरोबर सुवर्ण कळसातून संक्रमित झालेल्या सात्वीक लहरी गर्भगृहात प्रवेश करतात. या सर्व लहरींचा संगम तसेच गर्भगृहात चिंतन करणाऱ्या भाविकत्या लहरी यांचा त्रिवेणी संगम मंदिरामध्ये होतो. चित्त, चिंतन आणि चैतन्य एकरूप होऊन परमानंदाची प्राप्ती सहज होते. मनाला उन्मनी अवस्थेकडे प्रवाहीत करून भवसागर तरून जाण्यासाठी ज्या प्रसन्नतेची, पवित्रतेची गरज आहे, त्याची पूर्तता निश्चित सद्गुरूंच्याच मंदिरात होते. अशी अनेक भावीक भक्ताची अनुभूती आहे.म्हणूनतर सद्गुरू श्रीहरीबाबांच्या शिष्यपरिवारातील अनेक साधक गेल्या अनेक वर्षांपासुन संपूर्ण दिवस मंदिरात सेवा समर्पीत करतात.

पहाटे राधाकृष्ण मूर्तीला अभिषेक स्नान, बाबांच्या समाधीला अभिषेक व कळसाच्या गाभाऱ्यात असलेल्या शिवालयात नित्य अभिषेक पुजा होते. सकाळी सात वाजता आरती, दुपारी मध्यान आरती, महाप्रसाद, सायंकाळी सातला आरती व महानैवद्य दाखवून शेजारती केली जाते. सेवेकरी नैवद्य(प्रसाद) स्वतः बनवून बाबांना अर्पण करतात. बाबांच्या आवडीचा भेळीचा प्रसाद आरतीनंतर वाटला जातो. सेवेकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही, आणि सेवेकरीही घेत नाहीत. पूजेसाठी लागणारे पूजासाहित्य हार, फुले, अगरबत्ती, कपूर, प्रसाद सेवेकरी श्रद्धेने घेऊन येतात.मंदिरातील साफसफाई, झाडलोट, देवाची वस्त्रे, फरशी पुसणे इत्यादी सेवा करतात. गुरुसेवेच फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही. असे श्रीहरीबाबांचे मंदिर आहे.

आखाडी गुरुपट

|| श्री रामानंद पंथ  ||

प.पु.सद्गुरू देव श्री दत्तात्रय

प.पु.सद्गुरू श्री रामानंद

प.पु.सद्गुरू श्री राघवानंद

प.पु.सद्गुरू श्री माधवानंद

प.पु.सद्गुरू श्री सहजानंद

प.पु.सद्गुरू श्री विमलानंद

प.पु.सद्गुरू श्री अंगीरानंद

प.पु.सद्गुरू श्री गंभीरानंद

प.पु.सद्गुरू श्री पुनीनंद

प.पु.सद्गुरू श्री प्रेमानंद

प.पु.सद्गुरू श्री ब्रम्हानंद

प.पु.सद्गुरू श्री श्रीधरानंद

प.पु.सद्गुरू श्री जिवानंद ( पिंजनस्वामी )

प.पु.सद्गुरू श्री देवीदास ( राममास्तर )

प.पु.सद्गुरू श्री साधूबाबा

प.पु.सद्गुरू श्री श्रीहरीबाबा

प.पु.सद्गुरू श्री राघवचैतन्यबाबा

( आखाडीपट पूर्ण )

|| साधू समर्थ सिताराम  ||

 

भेग की पुछ  

श्री - लाल श्री

आखाडा - उजागर आखाडा

गादी - गलीता गादी

मंत्र - रामतारकमंत्र

धाम - रामेश्वरधाम

सुखविलास - चित्रकोट सुखविलास

ठाव ( तीर्थ ) - बनारस

आचार्य - लक्ष्मण आचार्य

शाखा - आनंद शाखा

मुनी - वशिष्ट मुनी

देवता - हनुमंत देवता

पुजा - शालीग्राम पुजा

पंथ - रामानंद पंथ

वेद - यजुर्वेद

वाक्य - अहं ब्रम्हास्मि

दिशा - दक्षिणदिशा

पुराण - भागवत पुराण

प्रमाणग्रंथ - संत एकनाथी भागवत

दिक्षा - स्पर्शदिक्षा

सांप्रदाय - ब्रम्हसांप्रदाय

प्रवर्तक - साधुबाबा

वंदन - श्री साधु समर्थ सिताराम

 

|| भागवताची  वैशिष्टये ||

|| श्री सद्गुरुवे नमः ||

प्रेमाची पवित्र गंगा म्हणजे - भागवत

त्यागाचा पुतळा म्हणजे - भागवत

प्रेमाचे महाकाव्य म्हणजे - भागवत

भक्ती, ज्ञान आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे - भागवत

वात्सल्यभावाची मुर्ती म्हणजे - भागवत

प्रेमामृताने भरलेला घडा म्हणजे - भागवत

परमेश्वराचे दृश्य स्वरूप म्हणजे - भागवत

सर्व जीवाचे कोड पुरविणारा म्हणजे - भागवत

पवित्रतेचे मंगलमुर्ती म्हणजे - भागवत

देवांचा देवादिदेव म्हणजे - भागवत

परमात्म्याची वाङ्मय मुर्ती - भागवत

मृत्युचे भय नष्ट करणारा - भागवत

 

 

Share it now!
श्रीहरी बाबांचे मंदिर

 

[[{"fid":"10","view_mode":"wysiwyg","fields":{"alt":"shriharibaba samadhi","title":"shriharibaba samadhi","height":300,"width":400,"style":"width: 400px; height: 300px;","class":"media-element file-wysiwyg media-wysiwyg-align-left","data-delta":"1","format":"wysiwyg","alignment":"left","field_file_image_alt_text[und][0][value]":"श्रीहरीबाबा समाधी","field_file_image_title_text[und][0][value]":"श्रीहरीबाबा समाधी"},"link_text":null,"type":"media","field_deltas":{"1":{"alt":"shriharibaba samadhi","title":"shriharibaba samadhi","height":300,"width":400,"style":"width: 400px; height: 300px;","class":"media-element file-wysiwyg media-wysiwyg-align-left","data-delta":"1","format":"wysiwyg","alignment":"left","field_file_image_alt_text[und][0][value]":"श्रीहरीबाबा समाधी","field_file_image_title_text[und][0][value]":"श्रीहरीबाबा समाधी"}},"attributes":{"alt":"श्रीहरीबाबा समाधी","title":"श्रीहरीबाबा समाधी","height":300,"width":400,"style":"width: 400px; height: 300px;","class":"media-element file-wysiwyg media-wysiwyg-align-left","data-delta":"1"}}]]पवनामाईच्या पवित्र कुशीत पावन तीरावर पिंपळे गुरव गाव वसलेले आहे." data-share-imageurl="">